esakal | आजही संजय राऊतांनी केलंय ट्विट! काय केलंय बघा...
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut tweets on 29 Nov

संजय राऊत यांचे रोज एक ट्विट हे भाजपसाठी सूचक वक्तव्य असायचे. आजही त्यांनी एका कवितेच्या ओळी ट्विट करत म्हणले आहे की...

आजही संजय राऊतांनी केलंय ट्विट! काय केलंय बघा...

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई : महाविकासआघाडीची सत्तास्थापन करण्यात आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविण्यात सगळ्यात मोठा वाटा असेल, तो म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा. त्यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर झाला तसा ट्विट करण्याचा सपाटा सुरू ठेवला होता. आजही त्यांनी असेच ट्विट केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

संजय राऊत यांचे रोज एक ट्विट हे भाजपसाठी सूचक वक्तव्य असायचे. आजही त्यांनी एका कवितेच्या ओळी ट्विट करत म्हणले आहे की, 'हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं, कि बस पैदल ही राजा को मात करते हैं'. असे ट्विट करत पुन्हा एकदा त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. आमचं फक्त पायदळच राजावर मात करायला पुरेसं आहे, असा या ट्विटचा अर्थ होतो. 

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राऊत जे पहिल्यापासून म्हणत होते, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, ही गोष्ट खरी करून दाखवली. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत किमान-समान कार्यक्रमावर सत्तास्थापन करण्यात राऊतांचा मोठा वाटा आहे. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतील. काल त्यांच्यासह महाविकासआघाडीच्या सहा नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

हिच ती वेळ! मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

कालही ट्विट करत फडणवीसांना लगावला टोला
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस हे नेहमी राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नसल्याचे सांगत होते. यावरून संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला आहे. तसेच काल (ता.२७) झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्र विकास आघाडीच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून जाबाबदारी स्वीकारावी असे एकमताने ठरविण्यात आले. त्यानंतर आज शपथविधी झाल्यास संजय राऊत यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या.