बहुमत चाचणीपूर्वी संजय राऊतांनी केलंय 'हे' ट्विट!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

ठाकरे सरकार आज बहुमत सिद्ध करतील. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी आज ट्विट केलंय.  

मुंबई : महाविकासआघाडीची सत्तास्थापन करण्यात आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविण्यात सगळ्यात मोठा वाटा असेल, तो म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा. ते रोज काही ना काही सूचक ट्विट करतात. आज विधानसभेत बहुमत चाचणी आहे. ठाकरे सरकार आज बहुमत सिद्ध करतील. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी आज ट्विट केलंय.  

हिच ती वेळ! मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

राऊत आपल्या ट्विटमध्ये आज म्हणतात, 'आज बहुमत दिन.. 170+++++... हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं'. कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही, आम्ही बहुमत सिद्ध करूनच दाखवू असे संजय राऊतांना म्हणायचे असेल. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राऊत जे पहिल्यापासून म्हणत होते, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, ही गोष्ट खरी करून दाखवली. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत किमान-समान कार्यक्रमावर सत्तास्थापन करण्यात राऊतांचा मोठा वाटा आहे. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतील. काल त्यांच्यासह महाविकासआघाडीच्या सहा नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut tweets on 30 Nov