शरद पवारांची काम करण्याची 'ती' पद्धत आहे, संजय राऊतांनी सांगितला भन्नाट किस्सा..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी सर्वात जास्त मेहनत घेणारे नेते कोण? असं विचारलं तर सर्वात आधी उत्तर येतं, राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत. त्याला कारणही तसंच आहे, महाराष्ट्रात सत्तापालट होत असताना सर्वाधिक चर्चेत होते ते संजय राऊत आणि शरद पवार. 

मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी सर्वात जास्त मेहनत घेणारे नेते कोण? असं विचारलं तर सर्वात आधी उत्तर येतं, राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत. त्याला कारणही तसंच आहे, महाराष्ट्रात सत्तापालट होत असताना सर्वाधिक चर्चेत होते ते संजय राऊत आणि शरद पवार. 

अशात गेले काही दिवस संजय राऊत पुन्हा चर्चेत आहेत ते म्हणजे राऊत देत असलेल्या प्रकट मुलाखतींच्या माध्यमातून. संजय राऊत यांनी नाशकात अशीच एक प्रकट मुलाखत दिली. पत्रकार राजू परुळेकर यांनी संजय राऊतांची मुलाखत घेतली. यामध्ये संजय राऊत यांनी शरद पवारांवर आपलं मत व्यक्त केलंय. एकूणच महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल आणि त्यामागील शरद पवारांचे विचार यावर संजय राऊत यांनी दिलखुलासपणे आपलं मत व्यक्त केलंय.

मोठी बातमी - बाळासाहेब ठाकरे कुणाचे? 'शिवसेना-मनसे'त बाळासाहेबांवरून वादंग..

महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकतं हे शरद पवार आणि संजय राऊत यांना पक्कं ठाऊक होतं. शरद पवारांना ED ची नोटीस आल्यावर मी (संजय राऊत) शरद पवारांना भेटायला गेलो होतो. आमच्यात चर्चा झाली. महाराष्ट्रात भाजपाला रोखता येऊ शकतं हा विचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ED नोटीस आल्यावर सर्वप्रथम मनात आला, असं संजय राऊत यांनी सांगितलं. दरम्यान निवडणूक लागल्याने शरद पवार यांच्याशी बोलणं देखील गुन्हा होता. शरद पवारांच्या भेटीवेळी, देशासाठी मोठं योगदान असणाऱ्या नेत्यावर कारवाई होणं चुकीचं असल्याची भावना मी बोलून दाखवली होती. मी शरद पवार यांना म्हटलं होतं, शरद पवारांसारख्या नेत्यावर सूडबुद्धीनं कारवाई होऊ शकते तर इतरांचं काय? 

मोठी बातमी - महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या नादाला लागायचं नाही, मनसेचा सज्जड दम

शरद पवार सुरवातीपासूनच आम्ही विरोधी बाकावर बसणार हे बोलत होते, मात्र ही शरद पवारांची काम करण्याची पद्धत आहे असं देखील संजय राऊत म्हणालेत. 

shivsena MP sanjay raut unfolds memorable incident about NCP chief sharad pawar  

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena MP sanjay raut unfolds memorable incident about NCP chief sharad pawar