esakal | संजय राऊत पुन्हा लीलावतीत दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut went to Leelavati hospital for routine checkup

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज पुन्हा लीलावती रूग्णालयता दाखल झाले होते. 11 नोव्हेंबरला त्यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंर नियमित तपासणीसाठी आज पुन्हा ते लीलावती रूग्णालयात गेले होते.

संजय राऊत पुन्हा लीलावतीत दाखल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज पुन्हा लीलावती रूग्णालयता दाखल झाले होते. 11 नोव्हेंबरला त्यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंर नियमित तपासणीसाठी आज पुन्हा ते लीलावती रूग्णालयात गेले होते. या तपासणीनंतर ते मातोश्रीवर सुरू असलेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

या 'दोन' शिवसेना नेत्यांपैकी होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री!

गेले काही दिवस सत्तासंघर्ष सुरू आहे. भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाला. या सगळ्यात एकच नाव होतं, ते म्हणजे संजय राऊत. संजय राऊत दररोज ट्विट करत होते, रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपला खडे बोल सुनावत होते. या सगळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष झाले, त्यामुळे अँजिओग्राफीमध्ये 2 ब्लॉकेज आढळले होते. यानंतर लगेचच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकासआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना आता शिवसेनेतील कोणते नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले जाईल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, संजय राऊत या सर्वांचीच नावे मुख्यमंत्री पदासाठी घेतली जात आहेत. मात्र माध्यमांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे व संजय राऊत यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे.