
महाविकासआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना आता शिवसेनेतील कोणते नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले जाईल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुंबई : महाविकासआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना आता शिवसेनेतील कोणते नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले जाईल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, संजय राऊत या सर्वांचीच नावे मुख्यमंत्री पदासाठी घेतली जात आहेत. मात्र माध्यमांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे व संजय राऊत यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
काल रात्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने संजय राऊत व एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले गेले आहे. शिवसेनेची सध्या मातोश्रीवर सर्व आमदारांसह बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक नसल्याने ते इतर नेत्यांना संधी देतील, अशीही चर्चा सुरू आहे. तर संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनीच महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, असे त्यांनी सांगितले.
महाविकासआघाडीचं ठरलंय! पाच वर्ष सेनेचाच मुख्यमंत्री : संजय राऊत
आज (ता. 22) सकाळी शिवसेना खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली. यातही त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार व तो ही पाच वर्षांसाठी होणार. शिवसेनेचा पाच वर्षे मुख्यमंत्री व्हावा यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आज राऊत पुन्हा रूटीन चेकअपसाठी लीलावतीत दाखल झाले आहे. नुकतीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
संजय राऊतांनी केलंय पुन्हा ट्विट! आजचे ट्विट वाचाच...
संजय राऊतांनी केलंय पुन्हा ट्विट! आजचे ट्विट वाचाच...
राऊत आज आपल्या ट्विटमधून असे म्हणतात की, 'कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आ जाना ही अच्छा होता है| अहंकार के लिये नही.. स्वाभिमान के लिये!' त्यांच्या आजच्या ट्विटवरून भाजपवरची नाराजी थेट दिसून येते. काही नात्यातून बाहेर पडलेलेलच चांगले असते, अहंकारासाठी नाही, तर स्वाभिमानासाठी, असे राऊत म्हणतता. युतीच्या संबंधांवर त्यांनी ट्विटमधून थेटपणे भाष्य केले आहे.