मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, उद्धव ठाकरेंनी शिवसेना मंत्री आणि नेत्यांची वर्षावर बोलावली बैठक

मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, उद्धव ठाकरेंनी शिवसेना मंत्री आणि नेत्यांची वर्षावर बोलावली बैठक

मुंबई : एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारण. महाराष्ट्रात दोन्ही गोष्टी कमी होण्याचं नाव नाही. अशात मुंबईतून एक मोठी बातमी समोर येतेय. मुंबईत मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली घडताना पाहायला मिळतायत. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावलीये. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावर ही बैठक पार पडत असल्याची माहिती सामोर येतेय. महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत प्रत्यक्ष जे मंत्री उपस्थित नाहीत ते ऑनलाईनच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित असल्याचीही माहिती आहे. सदर बैठक शिवसेनेची आढावा बैठक असल्याचं बोललं जातंय.  

बैठक नेमकी कशासाठी ? 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या बैठकीत काही खास विषयांवर चर्चा केली जातेय. शिवसेनेतील सूत्रांकडून जी माहिती मिळतेय त्यानुसार या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि उपाययोजना हा मुख्य विषय असल्याचंही समजतंय. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या मंत्र्यांशी त्यांच्या संबंधित खात्यांसंदर्भात 'वन टू वन' बोलणार असल्याचं समजतंय. सोबतच आणखी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांच्या अचानक बोलावलेल्या बैठकीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. 

shivsena party chief uddhav thackeray called urgent meeting of shivsena leaders and ministers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com