esakal | अजित पवार आणि संभाजी राजेंच्या बैठकीत तात्काळ झाला 'हा' मोठा निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार आणि संभाजी राजेंच्या बैठकीत तात्काळ झाला 'हा' मोठा निर्णय...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेत आज मंत्रालयात सारथी संस्थेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली

अजित पवार आणि संभाजी राजेंच्या बैठकीत तात्काळ झाला 'हा' मोठा निर्णय...

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेत आज मंत्रालयात सारथी संस्थेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.  या बैठकीला स्वतः अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांना निमंत्रित केलं होतं. गेल्या काही दिवसात सारथी संस्था सुरु राहणार का? सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहणार का ? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. सोबतच सारथी संस्थेला सरकारकडून मिळणाऱ्या निधीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती संभाजी राजे, विजय वड्डेटीवार, नवाब मलिक, विनायक मेटे आणि सारथीशी निगडित सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार आणि संभाजी राजे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आजच्या बैठकीबाबत माहिती दिली. 

मोठी बातमी - मुंबईच्या रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत सांगून कोरोना पॉझिटिव्ह महिला निघाली आणि थेट गाठलं विमानतळ आणि जे झालं ते...

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरवातीला या बैठकीबाबत माहिती दिली. यामध्ये सर्वात आधी सर्वांचं म्हणणं एकूण घेतलं. सर्व बाबी ऐकून घेतल्यानंतर एक गोष्टी स्पस्ट करण्यात आली ती म्हणजे राज्य सरकार सारथी ही संस्था बंद करणार नाही. सारथी संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत असं अजित पवार म्हणालेत. दरम्यान सारथी संदर्भात सीताराम कुंटे यांना आम्ही अहवाल सादर करायला 14 दिवसांची मुदत दिली आहे. सोबतच उद्या सारथीला 8 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची सरकार पूर्ण काळजी घेईल. सोबतच तारादूत, फेलोशिप यांचे विद्यार्थ्यांचे पैसे दिले जातील असं अजित पवार म्हणालेत. याचसोबत सारथी संस्थेला आता नियोजन विभागाच्या अंतर्गत घेतले जाणार आहे. मंत्री विजय वड्डेटीवर यांनी अजित पवारांकडे तशी मागणी केली होती. सोबतच कौशल्य विभाग देखील नियोजन विभागाच्या अंतर्गत घेणार आहे. याबाबतचे सर्व निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेऊ असं अजित पवार म्हणालेत. मराठा समाजातील गरीब,आर्थिक दुर्बल घटकांना पुढे घेऊन जाणार असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. 

मोठी बातमी - अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील सारथी संस्थेसंदर्भातील बैठकीत गोंधळ

बैठकीतले की पॉईंट्स 

  • सारथी संस्थेची स्वायत्तता टिकवणार
  • वडेट्टीवार यांच्या खात्यातून सारथी संस्थेला उद्याच्या उद्या 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार 
  • सारथी संस्था स्थापन झाल्यापासून जे प्रश्न निर्माण झाले त्यासाठी सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल 14 दिवसात द्यावा 
  • मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला विनंती करणार की सारथी नियोजन विभागाच्या अंतर्गत आणावं सोबतच अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजन विभागात आणणार
  • मराठा समाजातल्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणारच 


मोठी बातमी  कोरोना नंतर ग्राहक संरक्षण विषयाच्या जागृतीबाबत आंतरराष्ट्रीय वेबिनार...

संभाजी राजे म्हणालेत : 

यावेळी संभाजी राजे यांनी देखील आपलं मत मांडलं. छत्रपती संभाजी राजे म्हणालेत की, खरंतर मला माझं मनोगत सभागृहात मांडायचे होतं. आम्हाला सारथी संस्था वाचवायची आहे, संस्थेची स्वायत्तता कुठल्याही परिस्थितीत टिकवायची  आमची मागणी आहे. येतंय काळात स्वतः अजित पवारांनी यामध्ये लक्ष घालून सारथी संदर्भातील काम पाहावं अशीही चर्चा झाल्याचं राजेंनी सांगितलं. 

यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.या विषयात मला जबाबदार धरलं जात होतं. म्हणून अजित पवारांनी मिटिंग लावावी अशी मी मागणी केली होती. यानंतर स्वतः अजित पवारांनी संभाजी राजे यांच्याशी बोलून आज बैठक घेतली आणि प्रश्न मार्गी लावला आहे. 

eight crore rupees will be given to sarathi by tomorrow decision taken in ajit pawar and sambhaji raje meeting