esakal | जुन्या मैत्रीची नवी सुरूवात? भाजप नेता पत्रावर म्हणतो...
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या मैत्रीची नवी सुरूवात? भाजप नेता पत्रावर म्हणतो...

जुन्या मैत्रीची नवी सुरूवात? भाजप नेता पत्रावर म्हणतो...

sakal_logo
By
विराज भागवत

'प्रताप सरनाईक लेटरबॉम्ब'वरून महाराष्ट्राचं राजकारणात रंगल्या जोरदार चर्चा

मुंबई: राज्यात काँग्रेस 'एकला चलो रे'ची भूमिका घेत असल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दिक चकमकी सुरु आहेत. अशातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या 'भाजपशी जूळवून घ्या', या लेटरबॉम्बमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावर सर्वच पक्षातील नेतेमंडळी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं. (Shivsena Pratap Sarnaik Letterbomb BJP Prasad Lad gives Reaction over Friendship Cm Uddhav Thackeray Devendra Fadnavis)

हेही वाचा: प्रताप सरनाईकांच्या पत्रावर संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया

भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले, "आमदार प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असेल, तर तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्या पत्राचा विचार मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून नाही, तर पक्षप्रमुख म्हणून करावा. पक्षांतर्गत विषयावर चर्चा करुन त्यावर निर्णय घ्यावा. भारतीय जनता पक्षाची यामध्ये कुठलीही ठोस भूमिका नाही. भाजपची या विषयावर चर्चा झालेली नाही. राजधानी दिल्लीत झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये. मागच्या 25 वर्षांपासूनची भाजप-शिवसेनेची युती ही हिंदुत्वांची आणि विचारांची युती होती."

हेही वाचा: "लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त..."; शिवसेनेला टोला

"बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून ही युती हिंदुत्वाचा विषय घेऊन मागच्या 25-30 वर्षांपूर्वी झाली होती. महाविकास आघाडीचं सरकार बनवत असताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेनेनं केलं. त्यावेळी अनैसर्गिक युती करण्याचं काम करण्यात आलं. या महाविकास आघाडीचा फायदा केवळ शिवसेनेच्या मंत्र्यांनाच होत आहे पण सर्वसामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिक या गोष्टीमुळे दु:खी आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असणार की हिंदुत्वाच्या विषयात शिवसेना कुठेतरी मागे पडते आहे. म्हणून भाजपच्या युतीविषयी ते हल्ली चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचा तो पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी पक्षप्रमुखांशी चर्चा करुन पक्षपातळीवर निर्णय घ्यावा", अशी भूमिका प्रसाद लाड यांनी व्यक्त केली.

loading image
go to top