केंद्राने दाखल केली याचिका, कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात

सुनीता महामुणकर
Saturday, 28 November 2020

कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. केंद्र सरकारने या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. केंद्र सरकारने या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्राने कांजूरच्या जागेवर मालकी हक्क दाखविला आहे. दरम्यान, याबाबत चार आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

महत्त्वाची बातमी : मुलाच्या वजनाच्या दहा टक्केच! दप्तराचे ओझे केंद्राचे ‘स्कूल बॅग धोरण जाहीर

महसूल विभागाने नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेला हा निर्णय सारासार विचार न करता घेतला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. सन 1937 पासून मिठागरे केंद्र सरकारकडे आहेत. त्यावर मालकी हक्क राज्य सरकार दाखवू शकत नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. 

महत्त्वाची बातमी :  सीईटीच्या दहा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर; निकालाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना दिलासा

मेट्रो 3 कार शेडच्या कामाबाबत आरे वसाहतीमधील जागा राज्य सरकारने रद्द केली आहे. त्याऐवजी नव्याने कांजुरमार्ग येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. पुढील सुनावणी ता. 4 डिसेंबर रोजी आहे.

महत्त्वाची बातमी :  घाटकोपर येथे मालकिणीला ब्लॅकमेल करत अत्याचाराची घटना, पोलिसांकडून आरोपीला अटक

( संपादन - सुमित बागुल )

central government filed petition stating kanjurmarg land is in possession of central government

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central government filed petition stating kanjurmarg land is in possession of central government