Ravindra Waikar: रवींद्र वायकर अडचणीत? ठाकरे गटाने पाठवली नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण?

Thackeray group Notice: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
Ravindra Waikar Thackeray
Ravindra Waikar ThackerayEsakal

Mumbai News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रवींद्र वायकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.  अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वायकर यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी म्हणून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेना फुटीनंतरही रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले होते. पण, नंतर महिन्याभरापूर्वी वायकर ईडीच्या भीतीने शिंदे गटात गेले. शिंदे गटाकडून त्यांना वायव्य मुंबईत उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.

Ravindra Waikar Thackeray
Ravindra Waikar: "जेल किंवा पक्षबदल, माझ्याकडे दोनच पर्याय होते," लोकसभा लढवणाऱ्या शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक खुलासा

दोन दिवसाने विधानसभा अध्यक्षांना देखील नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. निवडणुकीनंतर त्यांच्यावर आमदारकीच्या अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी पुढे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Ravindra Waikar Thackeray
Eknath Shinde : मी ‘त्यांचा’ करेक्ट कार्यक्रम करणार! ; नामांतराविरोधात कोर्टात जाणारे लोक आघाडीचे

रवींद्र वायकर यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेचा तोंड फुटलं आहे. ते म्हणाले होते की, 'खोट्या प्रकरणात मला अडकवण्यात आले. एकतर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते. त्यामुळे मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मला खूप त्रासाला सहन जावं लागलं. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता.'

उत्तर पश्चिम मुंबईमध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. ईडीने दोन्ही नेत्यांवर आरोप केले असून त्यांची चौकशी सुरु आहे. वायकर यांनी महिन्याभरापूर्वीच शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. ईडीला घाबरुनच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असा दावा विरोधकांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com