esakal | 'मातोश्री' मुख्यमंत्र्यांवर नाराज !
sakal

बोलून बातमी शोधा

'मातोश्री' मुख्यमंत्र्यांवर नाराज !

मुख्यमंत्री समसमान वाटपाचं सूत्र नाकारत असतील तर बैठकीला काय अर्थ असं विचारत संजय राऊत यांनी बैठक रद्द झाल्याचं जाहीर केलं. 

'मातोश्री' मुख्यमंत्र्यांवर नाराज !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सत्तास्थापनेबद्दलची सेना-भाजप यांच्यातली पहिली बैठक रद्द करण्यात आली आहे. काही वेळात ही बैठक सुरु होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी 50-50 चा फॉर्म्युला नाकारल्यानं उद्धव ठाकरेंनी ही बैठक रद्द केलीय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली. या बैठकीसाठी दोन्ही पक्षांकडून २-२ नेत्यांची बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्री समसमान वाटपाचं सूत्र नाकारत असतील तर बैठकीला काय अर्थ असं विचारत संजय राऊत यांनी बैठक रद्द झाल्याचं जाहीर केलं. 

दरम्यान, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे, यात चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या सोबत सर्व प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. 

'अडीच-अडीच वर्ष' म्हणजे काय रे भाऊ ?

शिवसेनेसोबत अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असं कोणतही वचन दिलं नव्हतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. 5 वर्ष टिकेल असं सरकार स्थापन करू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. येत्या 8 तारखे आत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.  

WebTitle : shivsena refused to meet fadanvis and BJP after CM fadanvis says there was not any two and half years CM post sharing formula