esakal | "सेनापती कधीही युद्धभूमीवर जाऊन बसत नाही"; मुख्यमंत्र्यांची पाठराखण

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray
"सेनापती कधीही युद्धभूमीवर जाऊन बसत नाही"
sakal_logo
By
विराज भागवत

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतत बैठका घेऊन आणि चर्चा करून कोरोनाबद्दलची सूत्र आपल्या हाती ठेवली आहेत. कोणत्याही युद्धात पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा सेनापती स्वत: रणभूमिवर जाऊन बसत नाहीत. ते त्यांच्या वॉररूममध्ये बसून संपूर्ण यंत्रणा राबवतात. त्यातूच ते राज्याला किंवा देशाला विजयाकडे नेतात. सध्या राज्यात रूग्ण संख्या ज्या पद्धतीने कमी होतेय त्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांनाच द्यावं लागेल. ते ज्या प्रकारे एका जागी बसून यंत्रणा हातळत आहेत, त्याचं हे श्रेय आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी टीका करणं बंद केलं पाहिजे", अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आणि टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा: उद्धव ठाकरे गप्प आहेत, कारण... - प्रवीण दरेकर

"देशाची परिस्थिती गंभीर आहे. काही राज्यांनी सुरूवातीपासून टेस्टिंग केलं नाही. त्यामुळे आता ही लाट उसळली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल ही मोठी राज्ये आहेत. या राज्यातून आकडे येण्यास आता सुरूवात झाली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात आता कोरोना रूग्णसंख्या निम्म्यावर आली आहे. त्याचं कारण मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर सहकारी गावपातळीपर्यंत खोलात जाऊन या यंत्रणेची नीट अमलबजावणी होते की नाही, ते पाहत आहेत", असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीची स्तुती केली.

हेही वाचा: मुंबईचे डब्बेवाले संकटात, ठाकरे सरकारमुळे आर्थिक कोंडी

भारत देश २० वर्ष मागे गेलाय!

"आपला देश सध्या २० वर्षे मागे गेलाय. देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. गेल्या ५-१० वर्षात देश कधी पुढे गेला होता की नाही हे माहित नाही. पण सध्याच्या परिस्थितीत देश तब्बल २० वर्षे मागे गेलाय. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. सध्या फक्त लोकांचा जीवंत राहण्यासाठी संघर्ष सुरू आहे", असं मतदेखील राऊत यांनी व्यक्त केलं.