Sanjay Raut : शिवसेनेसाठी दहा वेळा तुरुंगात जायला लागलं तरी माझी तयारी - संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aditya Thackeray reaction on sanjay raut bail shivsena Maharashtra politics

Sanjay Raut : शिवसेनेसाठी दहा वेळा तुरुंगात जायला लागलं तरी माझी तयारी - संजय राऊत

मुंबई : आमच्या शिवसेनेनं मला खूप काही दिलं आहे. त्यामुळं मला दहावेळा तुरुंगात जावं लागलं तरी माझी तयारी आहे, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली आहे. तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

हेही वाचा: Sanjay Raut : शिवसेनेसाठी दहा वेळा तुरुंगात जायला लागलं तरी माझी तयारी - संजय राऊत

राऊत म्हणाले, "आम्ही कुटुंब आहोत त्यामुळं मी तुरुंगात गेलो कारण मला खात्री होती की उद्धव ठाकरे आणि वहिनी तसेच आदित्य माझ्या कुटुंबाची काळजी घेतील, त्या एका हिंमतीवर मी तुरुंगात गेलो. आमच्या मूळ शिवसेनेसाठी मला दहा वेळा जरी तुरुंगात जायला सांगितलं तरी मी जायला तयार आहे. कारण कधीतरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते. यासाठी जर माझ्यासारख्याची तयारी नसेल तर गेल्या चाळीस वर्षात पक्षानं मला जे भरभरुन दिलं त्याच्याशी ते कृतघ्नता ठरेल.

शिवसेनेचा महाराष्ट्रात एकच गट

बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत आणि आता आदित्यपर्यंतच हे महान नातं टिकलं पाहिजे. आम्ही कितीही मोठे झालो किती सर्वोच्चस्थानी पोहोचलो तरी पक्षाशी बेईमानी करणं चुकीचं आहे. मला सुटायचं, माझ्या पापापासून मुक्त व्हायचंय म्हणून मी आई मानतो त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणं आमच्या रक्तात नाही. काल माझ्या सुटकेनंतर लोकांना जो आनंद झाला. हे सगळे शिवसैनिक आहेत ते अचानक रस्त्यावर आले मलाही माहिती नव्हतं. मला जेलच्या बाहेर जायला अडीच तास लागले. हे जे प्रेम आहे ते शिवसेनेवरचं प्रेम आहे. शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे, गट वैगरे काही नाही. ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत.

राज्य फडणवीसच चालवत आहेत

महाराष्ट्रातील राजकारणातील कटुता संपवावी असं विधान जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ते महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळं मी त्यांना यासाठी भेटणार असं म्हटलंय की सध्या फडणवीसच राज्य चालवत आहेत, बाकीचे नुसतेच उंडारताहेत.

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

महाराष्ट्रातील राजकारणातील कटुता संपवावी असं विधान जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ते महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळं मी त्यांना यासाठी भेटणार असं म्हटलंय की सध्या फडणवीसच राज्य चालवत आहेत, बाकीचे नुसतेच उंडारताहेत.