esakal | एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकनाथ खडसे पक्षप्रवेश करतील. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राज्याच्या राजकारणात आज दुपारी २ वाजता मुंबईत मोठी घडामोड घडणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून भाजपामध्ये असणारे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करतील. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकनाथ खडसे पक्षप्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे पक्षप्रवेश करतील. दरम्यान आपल्यासोबत एकही आमदार किंवा खासदार राष्ट्रवादीत येणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी आधीच स्पष्ट केलंय. आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राजकारणात मागचं विसरुन पुढं जायचं असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचा खडसेंकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे. त्याकडे आम्ही बघतोय. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्षांपासून खडसे राज्याच्या राजकारणात काम करत आहेत. हा जो काही मामला आहे तो राष्ट्रवादी आणि भाजपचा असल्याचं राऊत म्हणालेत. 

पुढे राऊत म्हणाले की, भाजप हा मोठा राजकीय पक्ष आहे. खडसेंवर पक्षात जो काही अन्याय झाला तो त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना कळवला. राजकारणात परिस्थितीनुसार गळती लागत असते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे राजकारणात अशा गोष्टी घडत असतात, असंही ते म्हणालेत. 

अधिक वाचा-  आज वर्षा बंगल्यावर अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाची बैठक

एबीपी माझाच्या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार,  ट्रेलर झालाय आता पिक्चर बाकी आहे का? असा सवाल राऊतांना विचारला असता त्यांनी त्यावर म्हटलं की, दसरा मेळाव्यावर लक्ष ठेवा. 

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

गुरुवारी दुपारी एकनाथ खडसे जळगावहून स्पेशल चार्टर्ड हेलिकॉप्टरनं कुटुंबासह मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही होत्या. 

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. तर सून रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील.  एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये, असंही ते म्हणाले आहेत.

Shivsena Sanjay Raut reaction Eknath Khadse join into NCP