
डोंबिवली : नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्याने नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव दरवर्षी पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढत दर्याला नारळ अपर्ण करत शांत होण्याचे आवाहन करतात. सालाबादाप्रमाणे यंदा देखील कल्याणात नारळी पौर्णिमानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी किल्ला गणेश घाट पर्यंत आगरी कोळी बांधवांनी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत हजारो आगरी कोळी बांधव पारंपारिक वेशभूषित वाजत गाजत सहभागी झाले होते.