राज्यपालांच्या विधानावर शिंदे गट नाराज; केंद्राकडं करणार तक्रार

राज्यपालांचं विधान हे मुंबईबद्दला अभ्यास नसल्याचं द्योतक असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
Koshyari_Kesarkar
Koshyari_Kesarkar

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्य शासनानंही नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांचं हे विधान राज्याचा अपमान करणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडं आम्ही तक्रार करणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Koshyari_Kesarkar
"राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये"; मनसेनं फटकारलं

केसरकर म्हणाले, राज्यपालांनी जे विधान केलं आहे ते राज्याचा अपमान करणारं विधान आहे. राज्यापाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळं राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना कळवू शकतं.

मुंबईसाठी केवळ दोनच समाजाचं योगदान नाही

मुंबई कॉस्मॉपोलिटन शहर आहे. इथे केवळ दोनच समाजाचं योगदान नाही, तर अनेक समाजाच मुंबईच्या विकासात योगदान आहे. यामध्ये मुंबईचं मूळ मराठीचं आहे. तसेच मुंबईच्या उभारणीत सर्वाधिक वाटा हा मराठी माणसाचाच आहे ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळं दोन समाज का? पारसी सामाजानं देखील मुंबईच्या औद्योगीत वाढीत मोठं योगदान दिलं आहे. पण एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्या योगदानाबद्दल बोलायचं असतं पण त्यांनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही, असं म्हणणे म्हणजे मुंबईबद्दला अभ्यास केलेला नाही हे द्योतक आहे, असंही केसरकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई आर्थिक राजधानी का आहे? तर बहुतांश बँकांचं हेडक्वार्टर मुंबईला आहे. स्वतः रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबईत आहे. त्यामुळं आर्थिक राजधानी कशाला म्हणतात की, एकत्रित जो कर दिला जातो त्यांपैकी पूर्वी ४० टक्के हिस्सा एकट्या मुंबई शहरातून येत होता. त्यामुळं हे जे योगदान आहे ते कुठल्या एखाद्या समाजामुळं नाही तर सर्व समाज एकत्र आल्यानं झालं आहे. मुंबई केवळ लाठी आणि लोटा घेऊन लोक आले पण त्यांना या शहरानं आश्रय दिला मोठं केलं. त्यामुळं कोणीही बाहेरुन गुंतवणूक घेऊन मुंबईत आलेलं नाही, असंही यावेळी केसरकर म्हणाले.

संजय राऊतांच्या टीकेला उत्तर

राज्यपालांच्या विधानावरुन शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला जाब विचारला होता. त्यांना उत्तर देताना केसरकर म्हणाले, राज्यपालांच्या विधानाचा आम्ही शंभर टक्के निषेध करतो. याबाबत आम्ही केंद्र शासनाला कळवू की ज्यांची नियुक्ती राज्याचा घटनात्मक प्रमुख केलेली असते त्यांनी राज्याच्या भावना जपल्या पाहिजेत. त्यामुळं मुख्यमंत्री जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरुन परत येतील तेव्हा आम्ही सर्व आमदार त्यांना भेटून चर्चा करु. मुख्यमंत्री याची निश्चितच दखल घेतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com