यंदाच्या दसरा मेळाव्याबाबत मिळाले संकेत, शिवसेनेनं सामनातून स्पष्ट केली भूमिका

यंदाच्या दसरा मेळाव्याबाबत मिळाले संकेत, शिवसेनेनं सामनातून स्पष्ट केली भूमिका

मुंबईः  सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही आहे. अशातच आता शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा होणार की नाही? असा प्रश्न आता सध्या सर्वांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  दसरा मेळाव्याचे भविष्य या क्षणी अधांतरीच आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.  कोरोनानंतरच्या परिस्थितीची दाहकता स्पष्ट करताना दसरा मेळाव्याबद्दलही काही संकेत देण्यात आलेत. खरंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला. त्यानंतर राज्यावर कोरोनाचं संकट उभं ठाकलं. त्यानंतर पहिला दसरा मेळावा होणार आहे, मात्र हा दसरा मेळावा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

काय म्हटलं आहे आजच्या अग्रलेखात 

  • लोकांनी ईद साजरी केली नाही, सार्वजनिक गणेशोत्सवात संयम राखला. गणपती कधी आले व गेले ते समजलेच नाही. इतका फिका गणेशोत्सव इतिहासात कधी साजरा झाला नव्हता, पण संकटच असे गंभीर आहे की, आनंदास मुरड घालून सण-उत्सव साजरे करावे लागले आहेत. आता नवरात्री, दसरा, पाठोपाठ दिवाळी येत आहे. लगोलग नाताळ आणि नववर्षाचे आगमन आहेच. दसरा-दिवाळीत गर्दी तर होणारच. नवरात्रीच्या दांडियावर बंधने आलीच आहेत, पण शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही या क्षणी अधांतरीच आहे. 
  • लाखो लोक विचारांचे सोने लुटायला शिवतीर्थावर जमतात. महाराष्ट्रातला हा एक राजकीय, पण सांस्कृतिक उत्सवच असतो. अनेक वादळांत हा दसरा मेळावा आजपर्यंत झालाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असताना शिवसैनिकांच्या उत्साहास कसा बांध घालायचा हा प्रश्नच आहे. पण कायदा, नियमांचे पालन तर करावेच लागेल. छत्रपती शिवराय, आई जगदंबा जो मार्ग दाखवतील त्याच मार्गाने पुढे जावे लागेल. कायद्याच्या राज्याला गालबोट लागेल आणि त्यामुळे विरोधकांना टीकेचा दांडिया नाचवता येईल, असे काहीच घडणार नाही. 
  • हिंदुस्थानात कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे. गेल्या चोवीस तासांत 85 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण समोर आले. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत पंधरा हजार लोक कोरोनाग्रस्त झाले. त्यामुळे ‘अनलॉक-5’ मध्येही सगळे आलबेल आहेच असे नाही. महाराष्ट्रातले दोन प्रमुख मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे कोरोना संक्रमित आहेत. हे चित्र काही आशादायक नाही. स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हाच कोरोनावर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. मास्क ही ढाल, तर सामाजिक दुरी ही तलवार आहे. 
  • महाराष्ट्र सरकार राज्यातील ‘अनलॉक’ केंद्राच्याच मार्गदर्शक तत्त्वांनुसार करीत आहे व तेच योग्य आहे. लॉकडाउन २ आणि ३ चे पालन काटेकोरपणे झाले असते तर बऱ्याच गोष्टी सुरळीत झाल्या असत्या,”. “महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आजही कोरोनाग्रस्त आहेत. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतील स्थिती अद्यापही संपूर्ण नियंत्रणाखाली आलेली नाही व पंतप्रधान मोदी हे सर्वच बाबतीत ‘जादूगार’ किंवा सुपरमॅन असले तरी कोरोनास पळवून लावणारी जादूची छडी त्यांच्या हाती नाही. 
  • अनलॉक-5’ मध्ये नव्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. चांगली बातमी अशी की मुंबईतील डबेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे, पण मुळात मुंबईची उपनगरीय रेल्वे सुरू झाली आहे काय? पुण्याच्या लोकल सेवेस सरकारने परवानगी दिली, पण मुंबईचा नोकरदार वर्ग आजही लोकलच्या प्रतीक्षेत फलाटावरच उभा आहे. उद्योगधंदे उघडण्यास परवानगी दिली, पण कामगार कामाच्या ठिकाणी कसा पोहोचणार? म्हणजे रेस्टॉरंट उघडा असे सांगितले, पण रेस्टॉरंटमध्ये काम करणारा नोकरवर्ग त्या ठिकाणी कसा पोहोचणार? याचे नियोजन नीट झालेले दिसत नाही. गर्दी टाळता यावी म्हणून दिवस व रात्र अशा दोन वेळांत काम व्हावे. त्यामुळे काही नियम पाळता येतील, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होईल असे त्यांनी स्पष्ट केले. पण हे सर्व कधी व कसे घडणार?,” असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
  • हे सर्व ठीक असले तरी अनलॉक-5 मुळे लोकांचे जनजीवन थोडे तरी रुळावर यावे अशी अपेक्षा आहे. नोकरीधंद्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे राज्याची व देशाची अर्थव्यवस्था ठेवा बाजूला, सामान्यांची, मध्यमवर्गीयांची तोळामासाची अर्थव्यवस्थाही मातीमोल झाली आहे. सर्वत्र अंधकार आणि निराशा आहे. त्या निराशेतून लोकांना बाहेर काढले नाही, तर महाराष्ट्राच्या लढवय्या परंपरेस गालबोट लागेल.

Shivsena shivaji park dussehra celebration Chance cancelled saamana editorial corona sitution

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com