
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील नवीन पलावा पूल कामाच्या दर्जावरून अद्यापही गाजत आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे सतत पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात आहेत. यावरून आता आमदारांनी तिकडेच घर घ्यावे म्हणजे उठलं की लगेच जाता येईल, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी त्यांना टोला लगावला आहे.