
डोंबिवली : राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच डोंबिवली मधील पलावा पुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाच्या विरोधात शनिवारी ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याचे पहायला मिळाले. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत मनसे आणि ठाकरे गट मिळून शिवसेना शिंदे गटाला घेरण्याची शक्यता आहे.