'जुनी टाईमपास पद्धती नको'; शिवसेना नेत्याचा भाजपला खणखणीत टोला

'जुनी टाईमपास पद्धती नको'; शिवसेना नेत्याचा भाजपला खणखणीत टोला

मुंबई  ः जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पदधतीने घेण्यात काहीच गैर नाही. तरुण पीढीच्या संकल्पनांनुसार विकासकामे व्हायला हवीत, तुमच्या जुन्या वेळकाढू (टाईमपास करण्याच्या) पद्धतीने विकास शक्य नाही, असा टोला युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी भाजप नेते अतुल भातखळकर यांना लगावला आहे. ( Shiv Sena youth leader Siddhesh Kadam criticized BJP leader Atul Bhatkhalkar) या विषयावर ईसकाळ वेबसाईटवर आलेल्या बातमीचे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.  त्याला कदम यांनी ट्वीट करूनच वरीलप्रमाणे प्रत्युत्तर दिले आहे. 

 उद्या होणारी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक ही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. भातखळकर यांनी त्यावरून ठाकरे यांना लक्ष्य करताना ही महत्वाची बैठक प्रत्यक्ष घेण्याचा आग्रह केला होता. प्रत्यक्ष बैठक घेऊन थेट टीका ऐकण्याचे धाडस दाखवा, असाही टोमणा भातखळकर यांनी मारला होता. त्या वादात सिद्धेश कदम यांनी ठाकरे यांची बाजू घेताना ऑनलाईन बैठक घेण्यात गैर काय असे विचारले आहे. 

वेळेची बचत होणाऱ्या प्रभावी माध्यमांचा उपयोग करून जनतेच्या समस्या सोडवणे यात गैर काय. काळानुसार बदल आत्मसात करणे ही आजची गरज आहे. तरुण पीढीच्या संकल्पनेनुसार विकासकामे व उपाययोजना व्हायला हव्यात. तुमच्या जुन्या आणि टाईमपास करण्याच्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास होणे शक्य नाही, असे ट्वीट कदम यांनी करून नवे आधुनिक मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. 

आजच्या कोरोना साथीच्या काळात ऑनलाईन बैठका हा महत्वाचा उपाय ठरला आहे. एरवीही देशाच्या कानाकोपऱ्यातील अधिकाऱ्यांच्या, लोकांच्या प्रत्यक्ष बैठका घेणे हा अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ उपाय ठरू शकतो. त्यामुळे उपाययोजनेला उशीर होऊ शकतो. त्याऐवजी ऑनलाईन बैठक तासाभरात आटोपून क्षणात निकाल देऊ शकते. त्यामुळे असे मार्ग स्वीकारण्यात काहीच गैर नाही, असेही कदम यांनी दाखवून दिले आहे.

ShivSena youth leader Siddhesh Kadam criticized BJP leader Atul Bhatkhalkar

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com