शिवसेनेची डरकाळी पश्चिम बंगालमध्येही घुमणार; विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा

तुषार सोनवणे
Sunday, 17 January 2021

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राजकारण तापले असताना, शिवसेनेनेही त्यात उडी घेतली आहे.

मुंबई - राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. शिवसेनेने त्यानंतर बिहार आणि इतर निवडणूकांमध्येही आपले उमेदवार निवडणूकांच्या रिंगणात उतरवले होते. राज्यातील महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर शिवसेना पश्चिम बंगालमध्येही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

बिहार विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. राज्यासह देशातही भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहे. राज्या बाहेर शिवसेनेला मतदारांनी प्रतिसाद दिला नसल्याचे सध्यातरी चित्र आहे, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राजकारण तापले असताना, शिवसेनेनेही त्यात उडी घेतली आहे. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासंबधीचे ट्विट त्यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSenas Announcing to contest assembly elections of west bengal