Mumbai News: एमएमआरडीएला ‘शिवशाही’च्या घरांची भुरळ; खरेदीचा प्रस्‍ताव

MMRDA: शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने ३२३ सदनिका एमएमआरडीएला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. मात्र या सदनिका एमएमआरडीए आता मालकीतत्त्वावर खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
MMRDA

MMRDA

ESakal

Updated on

मुंबई : शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने आपल्या जोगेश्वरी येथील ३२३ सदनिका एमएमआरडीएला ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्या सदनिकांची आता एमएमआरडीएला भुरळ पडली असून, त्या मालकीतत्त्वावर खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार ४२ कोटी रुपये किमतीला खरेदी करण्याचा प्रस्ताव शिवशाहीला दिला आहे. मात्र, संक्रमण सदनिका विकता येत नसल्याने शिवशाहीने एसआरए प्राधिकरणाकडे सल्ला मागितला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com