

Shivshahi Housing Project
ESakal
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडने कंबर कसली आहे. त्यानुसार शिवशाही आता पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय २.०) अंतर्गत १० हजार घरे उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात प्रत्येकी पाच हजार घरे उभारली जाणार आहे. या प्रस्तावाला राज्यस्तरीय नियंत्रण समितीने मंजुरी दिली असून राज्य सरकार आता त्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे.