धक्कादायक! भीतीने विद्यार्थी हाॅस्टेल सोडून जात आहेत घरी

धक्कादायक! भीतीने विद्यार्थी हाॅस्टेल सोडून जात आहेत घरी
Updated on

मुरबाड : मुरबाड येथील आदिवासी मुलांच्या सरकारी वसतिगृहात राहणाऱ्या बंडू निरगुडा या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 28 जानेवारीला घडली होती. या घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून या भीतीपोटीच 75 टक्के मुले वसतिगृह सोडून घरी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सद्यस्थितीत 60 विद्यार्थ्यांपैकी अवघे 14 विद्यार्थी येथे राहत आहेत. 
मुरबाड शेजारील देवराळ वाडी येथील बंडु निरगुडा हा मुरबाडमध्येच आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. वसतिगृहात बंडूचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. नेमके याच दिवशी रखवालदार गैरहजर होता. वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्याने हा घातपात आहे की आत्महत्या, याचा उलगडा करण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या प्रकारानंतर वसतिगृह प्रशासनाने येथे तातडीने सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत.

मुरबाड येथील या वसतिगृहात सहा महिन्यांपूर्वी मुलांच्या जेवणात पाल आढळल्याची घटना बंडू याने उघडकीस आणली होती. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तर जेवणाच्या कंत्राटदारासही काळ्या यादीत टाकण्यात आले होते. याचा राग मनात धरून माझ्या मुलाचा ठेकेदार, विद्यार्थी व रखवालदाराने घात केल्याचा संशय मुलाचे वडील रामा निरगुडा यांनी व्यक्त केला आहे. बंडूवर कोणत्याही प्रकारचा ताण नव्हता. तसेच गेल्या काही वर्षांपासून तो वसतिगृहात रहात असल्याने त्याला त्या वातावरणाची सवय होती. त्यामुळे तो आत्महत्या करणे शक्‍य नाही, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, नातेवाईकांनी सदरच्या घटनेवर संशय व्यक्त केल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप नातेवाईकांना मिळालेला नाही. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये नेमकी काय माहिती मिळाली, हे पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे नातेवाईकांचा संशय बळावला आहे. 


सोमवारी (ता. 27) रात्री बंडूने वसतिगृहात जेवण घेतले. त्यानंतर रात्री अकरा वाजता वसतिगृहाच्या परिसरात चक्कर मारली तोपर्यंत काहीही झाले. नव्हते सकाळी सातच्या सुमारास मुलांनी बंडूचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याचे मुलांनी सांगितले म्हणून त्वरित पोलिसांना कळवले. 
- सचिन शिंगणे, गृहपाल 
सरकारी वसतिगृह मुरबाड 

web title : Shocking Fearful students are leaving the hostel 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com