
नालासोपारा : पतीने पत्नी आणि पाच वर्षांच्या गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या करून आत्महत्या केल्याची घटना विरार येथे उघडकीस आली आहे. १२ वर्षांचा मुलगा शाळेत गेला असल्याने तो वाचला आहे.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर बोळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेरोजगारीमुळे आर्थिक विवंचना आणि कर्करोगग्रस्त पत्नीवर उपचारांसाठी पैसे नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे.