Bedroom Under Road : मालाडमध्ये रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली महापालिकेने सोसायटीच्या बेडरूमखालूनच रस्ता काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे इमारतीच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून रहिवासी संतप्त झाले आहेत.
मुंबई : पी-उत्तर विभागातील मामलेदार वाडीतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने थेट सोसायटीतील जागा ताब्यात घेतली आहे. प्रस्तावित रस्ता हा इमारतीच्या चक्क बेडरूम आणि बाल्कनीखालून जात असल्याचे समोर आले आहे.