esakal | सीबीआयच्या उपनिरीक्षकाला आयफोन १२ प्रो
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

सीबीआयच्या उपनिरीक्षकाला आयफोन १२ प्रो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधीत गैरव्यवहार प्रकरणाचा गोपनीय चौकशी अहवाल फोडण्यासाठी लाच म्हणून सीबीआयच्या (CBI) एका उपनिरीक्षकाला आयफोन १२ (iphone 12 pro) प्रो फोन दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या फोनची किंमत एक लाखापेक्षा (One Lakh) अधिक असल्याचे सीबीआयने (CBI) म्हटले आहे.

उपनिरीक्षक अभिषेक तिवारी आणि माजी मंत्र्याचे वकील आनंद डागा यांना अटक करण्यात आली असून त्यांनी तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले, की २८ जून रोजी अभिषेक तिवारी हे देशमुख प्रकरणासंबंधी तपासासाठी पुण्याला गेले होते. तेथे वकील आनंद डागा हे तिवारी यांना भेटले. तपासासंबंधीची माहिती देण्याच्या बदल्यात त्यांनी तिवारी यांना एक आयफोन १२ प्रो दिला.

हेही वाचा: Anil Deshmukh गायब असल्याच्या चर्चा रंगताच 'तो' VIDEO झाला व्हायरल

दोन दिवसांची कोठडी उपनिरीक्षक तिवारी आणि वकील डागा या दोघांना दोन दिवसाच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले.

loading image
go to top