पनवेल : शोले’च्या साक्षीदाराला संवर्धनाची गरज

विकासाच्या नावे पनवेलमधील धानसरच्या वटवृक्षावर कुऱ्हाड
Tree Cutting
Tree CuttingSakal media

पनवेल : अजरामर चित्रपटाच्या आवर्जून नोंद असलेला, एकेकाळी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडणाऱ्या ‘शोले’ या सुपरडुपर हीट सिनेमाचे (Sholay movie) चित्रीकरण झालेल्या कर्नाटक (karnatak) राज्यातील रामनगर गावात पर्यटकांना आकर्षित (tourist attraction) करण्यासाठी शोले, द थ्री डी व्हर्च्युअल व्हिलेज बनवण्याची घोषणा तिथल्या पर्यटन विभागाने केली आहे. मात्र शोलेसह कुली, तुफान, रामपूर का लक्ष्मण आदी चित्रपटातील साक्षीदार असलेला पनवेलच्या धानसर गावातील शेकडो वर्षे जुना वटवृक्षावर (tree in dhansar) विकासाच्या नावे कुऱ्हाड चालवली (tree cutting) जात असल्‍याने स्‍थानिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

Tree Cutting
यंदा उडवा दणक्‍यात बार; विवाहोच्छुकांसाठी ६२ मुहूर्त

एकेकाळी चित्रीकरणाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्‍या डेरेदार वृक्षाचे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामार्फत संवर्धन करण्यात यावे, अशी अपेक्षा माजी सरपंच रमेश वावेकर यांनी व्यक्त केली आहे. साधारण ९० च्या दशकात स्टुडिओ बाहेर चित्रीकरणाला प्राधान्य देत मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा शोध घेतला जाऊ लागला. तेव्हाच्या मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर असलेल्‍या धानसर गावातील शेकडो वर्षे जुन्या वडाच्या डेरेदार वृक्षाने चित्रीकरण करणाऱ्यांना भुरळ घातली.

१९७५ मध्ये आलेला शोले, १९८३ चा अमिताभ आणि अमृता सिंग या जोडीचा सुपरहिट चित्रपट कुली तर १९८९ मध्ये अमिताभ बच्चनची दुहेरी भूमिका असलेला व मीनाक्षी शेक्षांद्री, अमृता सिंग आणि प्रेम यांची भूमिका असलेल्या तुफान सिनेमाचे चित्रीकरण याच डेरेदार वृक्षाच्या सानिध्यात झाल्याची आठवण त्या काळी ८ ते १० वर्षाचे असलेल्या व शाळा चुकवून चित्रीकरण पाहण्यासाठी गेलेल्या सुंदर घरत यांनी सांगितली.

गावातील ज्येष्ठ नागरिक अरुण घरत यांना तर १९७२ मध्ये चित्रीकरण झालेल्या रामपूर का लक्ष्मण या सिनेमातील रणधीर कपूर आणि विजू खोटे यांच्यावर चित्रित झालेल्या चित्रपटातील ‘चाकू चलाना हो, तो पेहले पकडणा सीखो’ हा डायलॉग आजही तोंडपाठ आहे. कुली चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा पाळीव गरुड उडतानाचे चित्रीकरण करताना त्‍या काळी झाडाजवळ कृत्रिम पक्षी तसेच रोप वे तयार करण्यात आल्‍याचे आठवण काहीजण सांगतात. शोलेमधील ‘ये दोस्ती, हम नही छोडेंगे’ या अजरामर गीतातील काही दृश्‍येही याच वटवृक्षाच्या परिसरात चित्रित करण्यात आली होती.

Tree Cutting
नवी मुंबई :'शून्य प्लास्टिकची सुरुवात माझ्यापासून'

मुंबई पासून जवळ

मुंबईपासून जवळ आणि महामार्गालगत असल्याने शिवाय चित्रीकरणासाठी आवश्‍यक यंत्रसामग्रीची ने-आण करण्यास सोयीचे असल्‍याने धानसर या ठिकाणी चित्रीकरणाला पसंती दिली जात असल्‍याने जुने जाणते सांगतात. कुली चित्रपटाच्या वेळी अमिताभ बच्चन सलग पाच दिवस चित्रीकरणात व्यस्त होते, अशी आठवण काही ग्रामस्‍थ सांगतात.

तळोजाची नॅशनल बिर्याणी पसंत
तळोजा येथील नॅशनल हॉटेलमध्ये बनवण्यात येणारी बिर्याणी खाण्याला त्या काळी चित्रपटातील कलाकार विशेष पसंती देत होते. त्यामुळे धानसर येथील चित्रीकरणादरम्यान नॅशनल हॉटेलमधून स्पेशल बिर्याणी पार्सल म्हणून मागवली जायची.

आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेला वृक्ष संवर्धन करण्याची गरज
पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांमुळे एकीकडे नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होत असतानाच शेकडो वर्ष जुन्या वडाच्या झाडावर कुऱ्हाड चालवली जात आहे. भिंत उभी करून वृक्षाकडे जाणाऱ्या वाटाही बंद करण्यात आल्याने वृक्षप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. नव्याने स्थापित पनवेल महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाने धानसर गावातील या वटवृक्षाचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com