मालिकांचे शूटिंग सुरू झाले परंतु, तांत्रिक कामगार, ज्युनियर आर्टिस्टचे प्रश्न प्रलंबित...

मालिकांचे शूटिंग सुरू झाले परंतु, तांत्रिक कामगार, ज्युनियर आर्टिस्टचे  प्रश्न प्रलंबित...

मुंबई ः चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली, पण त्यानंतर अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न कायम आहे. शूटिंग सुरु झाले पण अजूनही अनेक तांत्रिक कामगार तसेच ज्युनियर आर्टिस्टचे प्रश्न संपलेले नाहीत. 

लॉकडाऊनमुळे आलेल्या ब्रेकनंतर शूटिंग सुरु झाले, पण त्यावेळी 33 टक्के लोकांनाच परवानगी देण्यात आली. त्यामुळे ज्युनियर आर्टिस्टसह स्टंटमन, स्टील कॅमेरामन यांच्यासह अनेक जणात कपात करण्यात आली आहे. अर्थातच यामुळे अनेकांचा रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. अनेक सेटवरील टेक्निशियन, दिग्दर्शक तसेच कलाकारही कमी केले आहेत. त्याचबरोबर ज्युनियर आर्टिस्ट, स्टील फोटोग्राफर, बूम मैन, स्पेशल इफेक्टस््, डान्सर्स, फायटर्स या सहा विभागांचे काम पूर्ण बंद आहे. या विभागात ना कोणी दहा वर्षाखालील आहे ना कोणी 65 वर्षावरील, मग त्यांना मनाई का अशी विचारणा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईचे अध्यक्ष व्ही एन तिवारी यांनी केली. आता याबाबत संघटनेचे प्रतिनिधी निर्मात्यांसह 22 जुलैला चर्चा करणार आहेत. 

शूटिंग सुरु असतानाही काम नाही ही वेळ सुमारे बावीसशे ज्युनियर आर्टिस्टवर प्रथमच आली आहे. अजून एक महिना हीच परिस्थिती राहिली तर काय होईल हे सांगता येत नाही. त्यांना सुरुवातीस काही स्टारनी साह्य केले, पण आता ही मदत बंद झाली असल्याचे सांगितले जात आहे. आम्हाला दुसरे काही काम येत नाही, मग जाणार कुठे अशी विचारणा काहींनी केली, तर काहींनी आम्ही वॉचमन, ड्रायव्हर होण्यासाठी अनेक लोकांकडे विचारणा केली. मात्र नव्या लोकांना कामावर घेतले तर आपल्याला कोरोना होईल अशी भिती त्यांना वाटत असते. काही पुरुष ज्युनियर आर्टिस्ट भाजी विकत आहे, काही ठिकाणी रोजनदारीवर कामाला जात आहे, पण आम्हा महिलानी काय करायचे अशी विचारणा अनेक महिला ज्युनियर आर्टिस्ट करतात. मुंबईत अधिकृतपणे आठशे महिला ज्युनियर आर्टिस्ट असल्याचे सांगितले जात आहे.

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com