esakal | भेंडी बाजारात दुकानं उघडी असतात मग फक्त हिंदुंच्या वस्तीत कारवाई का? - संदीप देशपांडे
sakal

बोलून बातमी शोधा

sandeep 1.jpg

भेंडी बाजारात दुकानं उघडी असतात, मग फक्त हिंदुंच्या वस्तीत कारवाई का? - संदीप देशपांडे

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: मागच्या आठवड्यात मनसेचे (Mns) सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी एक व्हिडिओ टि्वट केला होता. मुंबईत आखून दिलेल्या वेळेपेक्षा, दुकानं जास्तवेळ सुरु (shops open) ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून (Traders) पैसे उकळले जात असल्याचा त्यांनी आरोप केला होता. आज त्यांनी व्हिडिओ संबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. (Shops open in bhendi bazar but action taken only in hindu areas why mns sandeep deshpande asks question)

"सध्या घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. मनसे या व्यापाऱ्यांसोबत कायम आहे. त्यातच काही वसुली करणाऱ्यांमुळे हे व्यापारी त्रस्त झाले आहेत आणि म्हणूनच त्यांनी आंदोलने केली" असं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. "मला चौकशीला बोलवावं वसुली करत आहेत, यासंदर्भात मी माहिती नक्कीच देईन" असं देखील संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.

हेही वाचा: अमित शाहांच्या सहकार खात्यावर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

"माझा व्हिडिओ हा व्यापाऱ्यांच्या विरोधात नव्हता. आठ वाजेपर्यंत त्यांना अधिकृत पद्धतीने दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात यावी. शनिवार-रविवारी दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी" अशी मागणी संदीप देशपांडेंनी केलीय. "तिकडे व्यापारच बुडाला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना व्यापार करता यावा, यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला होता. व्यापाऱ्यांवर अन्याय होतोय, त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी उभी रहाणार" असं संदीप देशपांडे यांनी म्हटलय.

हेही वाचा: निर्बंध हटवा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; दादरच्या व्यापाऱ्यांचा इशारा

"मला आरोप करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. पण व्यापाऱ्यांना आठ वाजेपर्यंत दुकान उघडी ठेवायला आणि शनिवार-रविवारी व्यापार करायला परवानगी द्यावी. हे व्यापारी पोलिसांना घाबरत आहेत. पोलिसांकडूनही त्यांच्यावर दबाव असेल" असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

"निवडणुकीवर बहिष्कार घालण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यांना निवडून द्यावे. निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हा काही मार्ग नाही. व्यापाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत. त्यांना ताकद मिळणं महत्त्वाचं आहे" असं संदीप देशपांडेंनी सांगितलं. "भेंडी बाजारात दुकानं उघडी असतात, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मालवणी मध्ये दुकान उघडी असतात तिथे कारवाई करत नाही. फक्त हिंदुंच्या एरियामध्ये कारवाई केली जाते, असं का?" असा सवाल देशपांडेंनी विचारला.

loading image