esakal | निर्बंध हटवा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; दादरच्या व्यापाऱ्यांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

निर्बंध हटवा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; दादरच्या व्यापाऱ्यांचा इशारा

निर्बंध हटवा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; दादरच्या व्यापाऱ्यांचा इशारा

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: मुंबईत कोरोनाची स्थिती (corona situation) पूर्णपणे नियंत्रणात आलीय. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. पण अजूनही सरकारने मुंबईला लेव्हल ३ (Mumbai level three) मध्येच ठेवले आहे. डेल्टा व्हेरिंयट (delta variant) पसरेल या भीतीपोटी व्यापाऱ्यांना दुपारी चार वाजेपर्यंतच दुकानं खुली ठेवण्याची परवानगी आहे. या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांच्या उत्पन्नावर (traders income) गंभीर परिणाम होत आहे. लोकल सेवाही बंद असल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात तीव्र नाराजी आहे. (otherwise we will ban election traders in dadar warn thackeray govt)

आज दादरमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या निर्बधांविरोधात आंदोलन केलं व निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. अनेक महिन्यांपासून दुकान बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. निर्बंध आणि SOP पाळत आम्ही दुकानं सुरू ठेवतो. मात्र त्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, ही मागणी घेऊन आज दादर व्यापारी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं.

हेही वाचा: "सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी..."; चित्रा वाघ यांची टीका

या वेळेस सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर गांधीगिरी करून येत्या निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्यात येईल, असा व्यापारी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय संदीप देशपांडे आणि जे आरोप केलेत त्याबद्दल त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत, असे देखील आव्हान या संघटनांनी केलं.

हेही वाचा: अमित शाहांच्या सहकार खात्यावर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

आज पर्यंत असे दिसून येत आहे की, मुंबईच्या काही विभागात शासनाच्या निर्बंधांचे पालन पाहिजे तसे होत नाही. शनिवार व रविवारी दुकाने उघडी ठेवली जातात आणि कायद्याचे उल्लंघन केले जात आहे आणि हे फक्त आणि फक्त नाईलाजाने पोटाची खळगी भरण्यासाठी केले जात आहे शेवटी आता अस्तित्वाचा प्रश्न उभा झाला आहे. आता त्यांना त्यांचे खर्चाचे नियोजन करणे कठीण झाले आहे उदाहरणार्थ दुकानाचे भाडे, मुलांच्या शाळेची फी , कामगार वर्गाचा पगार, विविध कर, स्टाफ चा पगार, ई एम आय वगैरे खर्चाची पूर्तता करण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला दिसत नाही असे व्यापारी वर्गाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

loading image