esakal | सावधान ! ऑरेंज अलर्ट जारी, मुंबईमध्ये दोन दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता 
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान ! ऑरेंज अलर्ट जारी, मुंबईमध्ये दोन दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता 

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी 

सावधान ! ऑरेंज अलर्ट जारी, मुंबईमध्ये दोन दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत आज आणि उद्या दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून मुंबई सह पालघर, ठाणे, रायगड जिल्हात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली. मुंबई आज काही ठिकाणी  हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. संध्याकाळी साडेपाच्या नोंदीनुसार कुलाबा येथे 02.8 मिमी तर सांताक्रुझ येथे 0.3 मिमी पावसाची नोंद झाली. ठाण्यामध्ये काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. 

येत्या २४ तासात मुंबईसह ठाणे, पालघर  विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अति जोरदार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

कौतुकास्पद! कोरोना योद्धे 'या' कामातही अग्रेसर; कोरोनाला हरवून दुसऱ्यांना देतायत जीवनदान..  

शनिवारी रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले. आठवडाभर दडी मारुन बसलेल्या पावसाने गुरुवारी मुंबई-ठाण्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. ठाणे आणि पनवेलमध्ये ढगांच्या प्रचंड गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. मुंबई पश्चिम उपनगाराच विजेकडकडाटसह पावसाच्या सरी बरसल्या. जुलैमध्ये संपूर्ण कोकणासह मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

मुंबई विमानतळाच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड; जीव्हीकेच्या अध्यक्षासह 'इतके' जण सीबीआयच्या रडारवर...

येत्या चार दिवसात  पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. चक्रीय वाऱ्यांचे एक क्षेत्र दक्षिण गुजरात आणि त्या जवळील भागात तर दुसरे पूर्व उत्तर प्रदेश याठिकाणी कमी जास्त प्रमाणात आहे. 4 जुलैपर्यत अशी परिस्थिती या भागात असणार आहे. तसेच तीव्र स्वरूपाची पश्चिम- उत्तर दमट हवा अरबी समुद्रापासून पश्चिम किनारपट्टीवर 5 जुलै पर्यत वाहणार आहेत. या प्रभावामुळे पाऊस सक्रिय होऊन मुसळधार स्वरूपात तो  पश्चिम किनार पट्टी आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. गुरुवारी सांताक्रुझ येथे 32 अंश सेल्सियस तर कुलाबा येथे 31.3 अंश सेल्सिएस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईच्या आर्द्रतेत वाढ झाली असून कुलाबा येथे सरासरी 83 टक्के तर सांताक्रुझ येथे 73 टक्के सरसरी आर्द्रता होती.

orange alert in mumbi heavy rain expected in next two days says IMD

loading image
go to top