मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाच्या नोंदणीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ८ आणि ९ मार्चला वरळीच्या एनएससीआय डोम येथे होणारा ‘भक्तीचा महाकुंभ’ भाविकांच्या गर्दीने फुलणार हे निश्चित झाले आहे. या उत्सवात एकाच छताखाली २१ श्रीगुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्याची संधी पहिल्यांदाच मुंबईकरांना मिळणार असल्याने भाविकांची लगबग वाढली आहे.
या सोहळ्यात वारकरी टाळ-मृदुंगासह सहभागी होणार असून रिंगणासह भक्तिसंगीताने हा महोत्सव सजवणार आहेत. विविध भजनी मंडळे, देवस्थाने, विविध संस्थांचे कार्यकर्ते समूहाने सहभागी होऊन या भक्तिसंगमाचा आनंदोत्सव साजरा करणार आहेत. मुंबईतील मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींसह उद्योगसंस्था, विविध कार्यालयातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईही या भक्तिसोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
या महोत्सवात शनिवारी (ता. ८) सकाळी १० वाजता ‘भक्ती शक्ती व्यासपीठा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उत्सवानिमित्त रविवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता आध्यात्मिक गुरू, लेखक, शिक्षणतज्ज्ञ तथा सत्संग फाउंडेशनचे प्रमुख पद्मभूषण श्री एम यांचे व्याख्यान होणार आहे.
उत्सवात पोहोचण्यासाठी महालक्ष्मी (पश्चिम रेल्वे), भायखळा (मध्य रेल्वे) ही नजीकची उपनगरीय रेल्वेस्थानके असून कार्यक्रमस्थळाशेजारी नेहरू तारांगण हे बेस्टचे नजीकचे बसस्थानक आहे. सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. प्रत्येकाला निर्विघ्नपणे श्री पादुकांचे दर्शन व्हावे म्हणून ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. त्यासाठी भाविकांना सोबतचे क्यूआर कोड स्कॅन करून आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.
महोत्सवात संत आणि गुरूंच्या पादुका
ज्ञानेश्वर महाराज
संत मुक्त्ताई
नामदेव महाराज
संत जनाबाई
नरहरी सोनार
सेना महाराज
सावता माळी
एकनाथ महाराज
तुकाराम महाराज
संत निळोबाराय
श्री महेश्वरनाथ बाबाजी
श्री स्वामी समर्थ
श्री साईबाबा
श्री गजानन महाराज
समर्थ रामदास स्वामी
टेंबे स्वामी महाराज
गोंदवलेकर महाराज
शंकर महाराज
गुळवणी महाराज
सद्गुरू गजानन महाराज
श्रीगुरू बालाजी तांबे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.