

Shrikant Shinde On Ganesh Naik
ESakal
अंबरनाथ : भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला डॉ. शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. “गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केले आहे, याचे त्यांनी भान ठेवावे. जर एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत कल्याण, ठाणे किंवा इच्छित मतदारसंघातून आमच्यासमोर येऊन निवडणूक लढवावी,” असे खुले आव्हान त्यांनी दिले.