

Shrikant Shinde
ESakal
डोंबिवली : “दिवेकर शिवसेना–महायुतीच्या नेहमीच भक्कमपणे पाठीशी उभे आहेत. गेल्या दहा वर्षांत जे काम करण्याचे वचन दिले, ते आम्ही पूर्ण केले आहे. दिवा शहराचा कायापालट करून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार जीवनमान देण्याचा आमचा निर्धार आहे,” असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यात शिवसेना–भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.