श्री सिद्धिविनायक मंदिर समिती न्यासाकडून शिवभोजन थाळीसाठी 'एवढा' निधी दिला जाणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

मुंबई - महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील दहा रुपयात शिवभोजन थाळी सुरु झालीये. महाविकास आघाडीच्या कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रभरात प्रायोगिक तत्त्वावर १० रुपयात जेवणाची शिवभोजन थाळी सुरु केली. या थाळीला मिळालेला प्रतिसाद पाहता या थाळीची व्याप्ती वाढव्याच्या  विचारात सरकार आहे. दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यातआलाय. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून शिवभोजन थाळीसाठी आता आर्थिक मदत केली जाणार आहे.

मुंबई - महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील दहा रुपयात शिवभोजन थाळी सुरु झालीये. महाविकास आघाडीच्या कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रभरात प्रायोगिक तत्त्वावर १० रुपयात जेवणाची शिवभोजन थाळी सुरु केली. या थाळीला मिळालेला प्रतिसाद पाहता या थाळीची व्याप्ती वाढव्याच्या  विचारात सरकार आहे. दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यातआलाय. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून शिवभोजन थाळीसाठी आता आर्थिक मदत केली जाणार आहे. याबाबतची माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिलीये. 

 

मोठी बातमीरात्री हॉलमध्ये ती एकटी झोपायची, चुलत भाऊ हळूच यायचा आणि...

श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास कायमच आपल्या दानपेटीत येणाऱ्या पैशांचा वापर नागरिकांसाठी करत असतो. याच भावनेतून विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते एक निर्णय घेण्यात आलाय. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेल्या १० रुपयांच्या शिवभोजन थाळीसाठी श्री सिद्धिविनायक मंदिर समिती न्यासाच्या वतीने ५ कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. लवकरच हा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे.  

siddhivinayak temple trust will give five crore to maharashtra government for shivbhojan thali


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: siddhivinayak temple trust will give five crore to maharashtra government for shivbhojan thali