रात्री हॉलमध्ये ती एकटी झोपायची, चुलत भाऊ हळूच यायचा आणि...

रात्री हॉलमध्ये ती एकटी झोपायची, चुलत भाऊ हळूच यायचा आणि...

नवी मुंबई - सख्या चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या 20 वर्षीय आरोपीला विशेष ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी मंगळवारी (ता. 25) दोषी ठरवून दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पीडित मुलीसह तिची आई आणि आजोबा अशा तिघांनी साक्ष बदलल्यानंतरही आरोपी भावाला दोषी ठरवत शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.

हा धक्कादायक प्रकार सप्टेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 दरम्यान नवी मुंबईतील सानपाडा परिसरात घडला होता. पीडित मुलीला सन 2017 मध्ये शिक्षणासाठी तिच्या आई व आजोबांनी नवीमुंबईत राहणाऱ्या काकांकडे पाठवले होते. तेथे ती इयत्ता नववीत शिकत होती. दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीत रात्री हॉलमध्ये एकटी झोपली असताना तिच्यासोबतच घराच राहणाऱ्या तिच्या चुलत भावाने तिचा विनयभंग केला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्यावर अत्याचारदेखील केला. अत्याचाराचे प्रकार वारंवार सुरूच राहिल्याने तिच्या पोटात दुखू लागले. त्याबाबत तिने मार्च 2018 मध्ये मैत्रिणीला सांगितले असता तिच्या मैत्रिणीने ही बाब वर्गशिक्षिकेला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंग आणि

अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. दोषारोपपत्र विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केल्यावर न्यायाधीश शिरभाते यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्या वेळी, सरकारी वकील संजय मोरे यांनी दहा साक्षीदार तपासले. याचदरम्यान, पीडित मुलीसह तिची आई आणि आजोबा अशा तिघांनी साक्ष फिरवली; मात्र वर्गशिक्षिका, डॉक्‍टर आणि पीडित मुलीच्या मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच सादर करण्यात आलेले साक्षी-पुरावे आणि मुलीच्या वैद्यकीय अहवालानुसार आरोपीला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर आरोपीला पोक्‍सो कलमांतर्गत दहा वर्षे तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

web title : While the sister was sleeping in the hall, he raped her

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com