सार्वजनिक परिवहन सेवेसाठी एकच पास; बेस्टच्या अर्थसंकल्पात घोषणा

समीर सुर्वे
Sunday, 11 October 2020

सर्व सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी एकच पास सुरु करण्याच्या घोषणांसह बेस्टचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांना सुपुर्द केला.

मुंबई : बेस्टच्या बसगाड्यांचा ताफा पुढील दोन वर्षात 6337 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्याचबोबर सर्व सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी एकच पास सुरु करण्याच्या घोषणांसह बेस्टचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांना सुपुर्द केला. बेस्टच्या परिवहन विभागाबरोबरच विद्युत विभागही तोट्यात आला असून 6 हजार 827 कोटी 13 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पात तब्बल 1 हजार 887 कोटी 73 लाख रुपयांची तूट राहणार आहे. 

ज्येष्ठांच्या तक्रार आयोगाचे कामकाज कधी सुरू करणार? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

आगामी आर्थिक वर्षात बेस्ट तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार आहे. बसस्थानके, बसथांबे, बसचौक्‍या अशा 800 ठिकाणी प्रवासी माहिती प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशाला पुढील बस किती वेळात येईल, हेही समजणार आहे. स्वयंचलित वीजमापक पायाभूत प्रकल्पांतर्गत "फॉल्ट पॅसेज इंडिकेटर' यासह एकत्रित केलेली वीजमापन पद्धती आणि उच्च विद्युत ग्राहकांसाठी 20 हजार स्मार्ट वीजमापकांची संच मांडणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बेस्ट उपक्रमाने गेल्या दोन वर्षात दोन लाख इलेक्‍टॉनिक मीटर बसवले आहेत. येत्या वर्षात आणखी 1 लाख इलेकट्रोनिक मीटर बसवले जाणार आहेत. 
देशातील सार्वजनिक वाहतुकीसाठी "नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच "एक देश, एक कार्ड' योजना राबवण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. त्यात मुंबईतील रेल्वे, बस, मोनोरेल, मेट्रो याचा समावेश आहे. याची अंमलबजावणी बेस्टच्या कुलाबा आणि वडाळा स्थानकात ऑक्‍टोबर 2020 पासून करण्यात येणार असल्याचे या अर्थसंकल्पात नमूद आहे. 

शहापुरातील जैवविविधता केंद्र उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत; लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती

नव्या इलेक्‍ट्रिक व सीएनजी बस 
सध्या बेस्टच्या ताफ्यात 3 हजार 875 बसगाड्या आहेत. त्यात भाडेतत्वावरील 1099 बसगाड्यांचा समावेश आहे. लवकरच 300 इलेक्‍ट्रिक बस आणि 600 सीएनजी बस ताफ्यात दाखल होणार आहे. त्यासाठी खरेदी आदेश देण्यात आल्याचे अर्थसंकल्पात नमूद केले आहे. 

 

थोडक्‍यात अर्थसंकल्प (आकडे कोटींमध्ये) 
विभाग उत्पन्न खर्च तूट 
विद्युत विभाग 3532.30 3,795.89 263.59 
परिवहन विभाग 1,407 3,031.24 1,624. 24 
एकूण 4,939.30 6,827.13 1,887.83 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Single pass for public transport service Announcement in BESTs budget