जीप-दुचाकी अपघातात दोघे ठार; सायन-पनवेल मार्गावरील घटना | Sion-panvel road Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

जीप-दुचाकी अपघातात दोघे ठार; सायन-पनवेल मार्गावरील घटना

नवी मुंबई : नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप जीपवर पाठीमागून भरधाव वेगात येणारी दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात (jeep Accident) दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी होऊन ठार झाल्याची (two people death) घटना मंगळवारी सकाळी सायन-पनवेल मार्गावर (sion-panvel road) वाशी फ्लाझा (vashi plaza) येथील उड्डाणपुलावर घडली. अपघातात दुचाकीस्‍वाराची निष्काळजी कारणीभूत असल्‍याचे लक्षात आल्‍याने वाशी पोलिसांनी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल (police FIR) केला आहे.

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED कोठडीत तीन दिवसांची वाढ

बर्फाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणारा महम्मद नसीर खान हा मंगळवारी सकाळी तुर्भे एमआयडीसी मधून बोलेरो पिकअप जीपमध्ये बर्फ भरून मानखुर्द-गोवंडी येथे जात होता. सायन-पनवेल मार्गावरील वाशी प्लाझा येथील उड्डाणपुलावर जीपचा पाटा तुटल्याने ती जागेवरच थांबली. त्यामुळे महम्मद तत्काळ याबाबतची माहिती मालकाला देऊन गाडी दुरुस्त करण्यासाठी मॅकेनिकला बोलावून घेतले. दुरुस्तीचे काम सुरु असताना, महम्मद खान व त्याचा भाचा या दोघांनी पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या माहितीसाठी गाडीच्या पाठीमागे प्लॅस्टिकचे क्रेड लावून ठेवले होते. तसेच स्वत: दोघे रस्त्यावर उभे राहून वाहनांना डाव्या बाजूने जाण्याचा इशारा करत होते.

सकाळी पावणे दहाच्या भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीला खानने सावकाश जाण्याचा इशारा केला. वेगात असलेल्या दुचाकीने प्लॅस्टिकचा क्रेड उडवून दुरुस्तीसाठी जीपला जोरदार धडकला. यात दुचाकीचालक अंकित महेंद्र यादव (२२) व त्याचा मित्र चंदन रामसमुज मौर्या (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान दोघांचा मृत्यू झाला. अपघातातील मृत्‍यू झालेले दोघे तरुण मानखुर्द येथे राहण्यास होते.

loading image
go to top