

Mumbai High Court raises questions over the SIR process and voter list changes after a Form 8 application
esakal
मुंबई उच्च न्यायालयाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया आणि त्यादरम्यान वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरच्या कार्यपद्धतीवर निवडणूक आयोगाला कडक शब्दांत सुनावले. “ही यंत्रणा कायद्यानुसार नव्हे, तर सॉफ्टवेअरनुसार चालत आहे,” असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने SIRच्या नावाखाली कायदे आणि नियम बाजूला ठेवता येणार नाहीत, असे स्पष्ट केले.