Raksha Bandhan: सुशांतच्या आठवणीत भावूक झाली बहिण श्वेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sushant

Raksha Bandhan: सुशांतच्या आठवणीत भावूक झाली 'बहिण' श्वेता

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या आत्महत्येला एक वर्षापेक्षाही जास्त काळ उलटला आहे. मात्र सुशांतचे चाहते आणि त्याच्या कुटुंबियांच्या आठवणीत तो अजूनही जिवंत आहे. कारण सुशांत गेल्यानंतरही त्याचे चाहते व नातेवाईक सोशल मीडियावर जुन्या आठवणी शेअर करत असतात. आज देशभरात रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021) हा सण उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने सुशांतची बहिण श्र्वेता सिंह किर्ती(Shweta Singh Kirti) हिने सोशल मीडियावर एक इमोशनल फोटो शेअर केला आहे.

आज देशभरात रक्षा बंधन साजरा होत असून, आपल्या भावाच्या हातावर लाडक्या बहिणी राखी बांधत आहे. या प्रसंगी श्र्वेताला देखील सुशांतची आठवण आलीये. कारण सुशांत विना हा त्यांचा दुसरा रक्षाबंधन आहे, त्यामुळे श्र्वेता आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात निराश असल्याचं पाहायला मिळत आहे. श्र्वेताने सोशल मीडियावर आजच्या दिवशी सुशांत सोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. त्याला पाहून सुशांतचे लाखो चाहते देखील इमोशनल झाले आहे, आणि श्र्वेताला कमेंट करून धीर देण्याचा प्रयत्न देखील करत आहे.

हेही वाचा: Raksha Bandhan: बॉलिवूडमधील भाऊ-बहिणींच्या जोड्या; पहा खास फोटो

श्र्वेताने फोटो शेअर करत "लव यू भाई, हम हमेशा साथ रहेंगे। #गुड़ियागुलशन।'' असे इमोशनल कॅप्शन लिहलं आहे. या फोटोत श्र्वेता पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये असून, चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. तर सुशांतने काळी पॅन्ट आणि मल्टीकलर टीशर्ट(Multicolour T-shirt) परिधान केला असून, तो श्र्वेताच्या मागे स्मित हास्य करतांना पाहायला मिळत आहे.

श्र्वेताने आजच्या दिवशी सोशल मीडियावर(Social media) शेअर केलेल्या फोटोला आतापर्यंत जगभरातील लाखो लोकांनी पाहिले आहे. सोबतच पुन्हा एकदा सुशांतचे चाहते इमोशनल झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

एका चाहत्याने कमेंट(Comment) करत लिहलं आहे की, "मिस यू सुशांत, आम्ही तुला कधीच विसरू शकत नाही. तू आमच्या आठवणीत जिवंत असेल." तर दुसऱ्या एका चाहत्याने शायरी लिहत म्हटलं आहे की, "रूह से जुड़े रिश्तों पर फरिश्तों के पहरे होते है। कोशिशें कर लो तोड़ने की ये और भी गहरे होते हैं" सुशांतचे जगभरात अनेक चाहते असून, त्याच्या फोटोवर 'मिस यू सुशांत' म्हणत त्याला आठवत आहे.

Web Title: Sister Shweta Became Emotional In Sushants Memory

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raksha Bandhan 2021