esakal | मुंबईत गंभीर रुग्णांचं प्रमाण ६ टक्के, रुग्णांसाठी फक्त 101 व्हेंटिलेटर उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत गंभीर रुग्णांचं प्रमाण ६ टक्के, रुग्णांसाठी फक्त 101 व्हेंटिलेटर उपलब्ध

मुंबईत नवीन रूग्ण तसेच ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या तरी कमी होत असली गंभीर रूग्णांचा आकडा कमी व्हायचं नाव घेत नाही. आज मुंबईत 23,976 ऍक्टीव्ह रूग्ण रूग्ण असून त्यातील 8,884 रूग्ण गंभीर आहेत.

मुंबईत गंभीर रुग्णांचं प्रमाण ६ टक्के, रुग्णांसाठी फक्त 101 व्हेंटिलेटर उपलब्ध

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत नवीन रूग्ण तसेच ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या तरी कमी होत असली गंभीर रूग्णांचा आकडा कमी व्हायचं नाव घेत नाही. आज मुंबईत 23,976 ऍक्टीव्ह रूग्ण रूग्ण असून त्यातील 8,884 रूग्ण गंभीर आहेत  गंभीर असून पालिकेच्या डीसीएचआय सह मोठ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत.

मुंबईत गंभीर रुग्णांचं प्रमाण 6 टक्क्यांच्या वर आहे. गंभीर रुग्णांची संख्या 8,884 इतकी असून त्यात 1,467 अति गंभीर आहेत. त्यांच्यावर डीसीएचआय सेंटर तसेच इतर मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यात येताहेत. 50 वर्षावरील रुग्णांची यात अधिक संख्या असल्याने अशा रुग्णांना होम क्वारंटाईन न करता कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत एकूण 2,018 आयसीयू खाटा आहेत.  त्यातील 1,784 खाटा भरल्या असून 234 खाटा उपलब्ध आहेत. तर 9.115 ऑक्सिजन खाटा असून त्यातील 6,070 खाटांवर रूग्ण उपचार घेत असून 3,045 खाटा उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटरची व्यवस्था असणाऱ्या 1,131  खाटा असून त्यातील 1,030 खाटा भरल्या असून केवळ 101 खाटा रिकाम्या आहेत. रूग्णांची संख्या वाढली तर मात्र या खाटा ही कमी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

अधिक वाचाः  राष्ट्रवादीनंतर काँग्रेसकडून रावसाहेब दानवे यांच्या टीकेचा समाचार

मुंबईत पॉझिटीव्ह रूग्णांचा दर हा 18.3 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत 9,199 रूग्ण दगावलेत. यात 50 वर्षावरील रूग्णांचे प्रमाण अधिक असून 7,793 मृत्यू हे 50 वर्षावरील आहेत. मुंबईतील एकूण रूग्णांपैकी 50 वर्षावरील रूग्णांची संख्या ही 91,636 इतकी आहे. तर मृत्यूदर हा 4.24 इतका आहे.

ज्येष्ठ नागरीक तसेच दिर्घकालीन आजारी व्यक्तींवर विषेष लक्ष देण्यात येत आहे. माझं कुटूंब,माझी जबाबदारीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या ऑक्सिजन तसेच इतर आजारांची माहिती घेण्यास भर देण्यात येत आहे. त्यासह छोट्या नर्सिंग होममध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांना रूग्णालयात उपचार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र रुग्णांशी चर्चा करून किंवा बीएमसीद्वारे चालविण्यात जंबो सुविधा किंवा मोठ्या खाजगी रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे.

अधिक वाचाः  मास्कच्या किंमती नियंत्रणात, एन 95 मास्क 19 रुपयात

पालिकेच्या रुग्णालयांतील मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. दिर्घकालीन आजार तसेच अधिक वय असलेल्या रूग्णांची अधिक काळजी घेण्यात येत आहे. गंभीर रूग्णांसाठी आवश्यक आयसीयी,व्हेंटीलेटर,ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली असून त्यांची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Six percent patients critically ill Mumbai With only 101 ventilators available

loading image