
मुंबई, ता.17 : कोविड संकटांमुळे राज्यातील कैद्यांना जामीनावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता परस्थिती सामान्य होत असल्यामुळे लॉकडाऊनंतर आणखी सहा कैद्यांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कैद्यांची संख्या 31 हजारांवर पोहोचली आहे.
राज्यातील कारागृहांमध्ये सुमारे 23 हजार 217 कैदी ठेवण्याची क्षमता आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कैद्यांची जामिनावर व पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. त्यावेळी राज्यातील कारागृहांमध्ये सुमारे 24 हजार कैदी होते. पण आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर राज्यातील कैद्यांची संख्येत सहा हजारांनी वाढ होऊन ती 31 हजारांवर पोहोचली आहे. मुंबई विभागात आर्थर रोड कारागृह, ठाणे, कल्याण, भायखळा, तळोजा येथील कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण होत आहे.
राज्यातील कोरोनादर कमी होत असताना आता कारागृहांमधील कोरोनाची स्थितीही सुधारली असून राज्यातील कारागृहांमध्ये गेल्या तीन महिन्यात एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेले नाही. राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व कारागृहांमधील कैद्यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याअंतर्गत राज्यातील 43 कारागृहांमधील 25 हजार 935 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात दोन हजार 388 कैदी कोरोना बाधीत आढळले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर दोन हजार 321 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या केवळ 67 कैदी सक्रीय रुग्ण होते.
आतापर्यंत राज्यातील कारागृहांमध्ये 6 कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण समाधानाची बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यात राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू नाही. पण वाढती कैद्यांची संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू शकते.
( संपादन - सुमित बागुल )
six thousand prisoners increased after lockdown social distancing might become major problem
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.