फरीद तनाशा हत्याप्रकरणी सहा जणांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई - गुंड छोटा राजन टोळीशी संबंधित फरीद तनाशा याच्या हत्येप्रकरणी बुधवारी विशेष सत्र न्यायालयाने 11 जणांना शिक्षा ठोठावली. त्यातील सहा जणांना जन्मठेप; तर पाच जणांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 

चेंबूर येथील घरात शिरून 3 जून 2010 ला फरीद तनाशाची हत्या करण्यात आली होती. छोटा राजनच्या बालेकिल्ल्यात त्याच्या टोळीतील सदस्याची हत्या करून भरत नेपाळीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या हत्येप्रकरणी आज विशेष न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी जाफर खान ऊर्फ अब्बास, मोहम्मद साकीब खान, रविप्रकाश सिंग, पंकज सिंग, रणधीर सिंग ऊर्फ निखिल, मोहम्मद रफीक समद शेख यांना जन्मठेपेची; तर बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय भाकरे, रवींद्र वरेकर, विश्‍वनाथ शेट्टी, राजेंद्र चव्हाण, दिनेश भंडारी ऊर्फ लालजी यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात 2016 मध्ये पोलिसांनी 11 आरोपींविरोधात विशेष मोका न्यायालयात आरोप निश्‍चित केले होते. 

Web Title: Six years of life imprisonment in Farid Tanasha murder case