

Dharavi redevelopment project
ESakal
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या आजवरच्या निकषांना छेद देत धारावी पुनर्विकास प्रकल्पात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना देखील घर देण्याचा ऐतिहासिक निर्णय राबविण्यात येणार आहे. मात्र, वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांची पात्रता ही मुख्यत्वे तळमजल्यावरील सदनिकाधारकाच्या पात्रतेवर अवलंबून असणार आहे. वास्तविक, 4 ऑक्टोबर 2004 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी धारावीत वास्तव्याला वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना देखील पुनर्विकासात सामावून घेतले जाणार आहे.