राजस्थानचे व्यावसायिक रायगडमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

रायगड जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर प्लास्टिकच्या भांड्यांची विक्री होताना दिसते. किमती कमी असल्याने या वस्तूंची चांगली विक्री होत आहे.

रोहा (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर प्लास्टिकच्या भांड्यांची विक्री होताना दिसते. किमती कमी असल्याने या वस्तूंची चांगली विक्री होत आहे. पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनलेल्या या भांड्यांची स्वस्त दरात विक्री करणे परवडते. दिवसभरात लाखाची विक्री होते, असे विक्रेते सांगतात. 

राजस्थानमधील जयपूर आणि अन्य ठिकाणांहून प्लास्टिकच्या विविध वस्तू घेऊन काही विक्रेते रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. प्लास्टिक बादली, टब, घमेले, स्टूल, जाळीदार टब अशा विविध वस्तूंची विक्री जोरात सुरू आहे. या वस्तूंच्या किमती बाजारभावापेक्षा कमी म्हणजे ५० ते १५० रुपयांच्या दरम्यान आहेत. टाकाऊ, पुनर्निर्मित प्लास्टिकपासून बनवलेल्या या वस्तूंची स्वस्तात विक्री करणे परवडते, असे विक्रेत्यांनी सांगितले. ते लाखाे रुपयांच्या वस्तूंची विक्री करतात. 

मजबुतीची खात्री
हे विक्रेते प्लास्टिकचे टब, बादली रस्त्यावर जोरात आपटून आणि त्यांच्यावर उभे राहून मजबुतीची खात्री ग्राहकाला पटवून देतात. त्यामुळे प्रभावित होऊन ग्राहक या वस्तू खरेदी करतात. 

प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवलेल्या या वस्तू मजबूत व स्वस्त असतात. या वस्तूंची १० ठिकाणी विक्री केली जाते. दररोज किमान एक लाखाची उलाढाल होते.
- बंटी गुज्जर, विक्रेता

या प्लास्टिकच्या वस्तू मजबूत असतात आणि स्वस्तात मिळतात. त्याबाबत खातरजमा करून खरेदी करतो. 
- प्रकाश शिर्के, ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small scale businessmen of Rajsthan has entered in Raigaid District