कोरोनासोबत जगताना SMS ही त्रिसूत्री महत्त्वाची : आरोग्यमंत्री राजेश टोपे

भाग्यश्री भुवड
Saturday, 5 September 2020

कोरोनासोबत जगताना एसएमएस ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी दोन हात या कार्यक्रमात सांगितले. 

 

मुंबई : कोरोना उपचाराबाबत राज्य सरकारने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत. कोरोनासोबत जगताना एसएमएस ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी दोन हात या कार्यक्रमात सांगितले. 

अहंकार जपण्यासाठी परिक्षा घेण्याचे नाटक! भाजप आमदाराची राज्यपालांकडे तक्रार

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनावर लस येईपर्यंत किती महिने लागतील हे सांगता येत नाही. लॉकडाऊन करत राहिलो तर अर्थव्यवस्थेचे काय होईल? ज्यांचे हातावर पोट आहे त्याचे काय होईल? बिझनेस हाऊसेस, व्यवसाय बंद होतील. त्यामुळे आपल्याला एसएमएस (एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायझर म्हणजेच सॅनिटाईज्ड हँड) पद्धतीने जगावे लागेल. अनावश्यक ठिकाणी जायचे टाळले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे. सध्या शाळा उघडल्या नाहीत. सतर्कता म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी पुन्हा सुरू करत नाही. पण, एसएमएस पद्धतीचा वापर करून जरूर आपले कार्य करावे आणि जेवढे टाळता येऊ शकत असेल त्या अनावश्यक गोष्टी जरूर टाळाव्यात.

काकस्पर्श होतोय दुर्मीळ! पितृ पंधरवड्यात कावळ्यांना महत्त्व; पण संख्या कमी 

राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू आहे. त्यामध्ये 1000 रुग्णालये आहेत. ज्यामध्ये आपण 100 टक्के कॅशलेस सेवा, एक रुपया न घेता या सगळ्या सुविधा देऊ शकतो. राज्य सरकारचे एकच लक्ष्य राहिले आहे की, सामान्य माणूस हा आमच्या डोळ्यांसमोर आहे. त्या दृष्टिकोनातून धोरणे आखली आहेत.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SMS is the three most important thing while living with Corona: Health Minister Rajesh Tope