
उल्हासनगर : अलीकडच्या काही महिन्यातच प्रतिनियुक्तीवर आलेल्या विशाखा मोटघरे,दिपाली चौगले या दोन महिला अधिकाऱ्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेत उपायुक्त पदभार स्विकारलेला आहे.आता महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या मान्यतेने प्रतिनियुक्तीवर आणखीन एका महिला उपायुक्तांची एन्ट्री झाली आहे.स्नेहा करपे या उपायुक्त महिला अधिकाऱ्यांचे नाव असून शुक्रवारी त्यांनी पदभार स्विकारला आहे.त्यामुळे पालिकेत आता प्रतिनियुक्तीवरील 4 उपायुक्त झाले आहेत.