वाह मस्तच! 'एसटी'चे एवढे कर्मचारी कोरोनामुक्त; कामावर परतण्यास सज्ज...

प्रशांत कांबळे
Thursday, 30 July 2020

सुमारे एक लाख चार हजार कर्मचारी असलेल्या एसटी महामंडळाचे आतापर्यंत 386 कर्मचाऱ्यांना कोव्हिडचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 280 कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर, 96 कर्मचारी रूग्णालयात उपचार घेत आहे.

मुंबई:  सुमारे एक लाख चार हजार कर्मचारी असलेल्या एसटी महामंडळाचे आतापर्यंत 386 कर्मचाऱ्यांना कोव्हिडचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 280 कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर, 96 कर्मचारी रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत 11 कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.  

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन; रिया चक्रवर्तीच्या वडिलांच्या नावावर घर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्चपासून मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली होती. त्यामूळे गेल्या तीन महिने सुमारे 2000 कर्मचारी दररोज 800 फेऱ्यांंद्वारे 15 हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करीत आहेत. यादरम्यान, एसटीच्या मुंबई व ठाणे विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. दिलासादायक म्हणजे बरे झालेल्या रूग्णांमध्ये ठाणे विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून तेथील 139 रुग्णांपैकी 126 रुग्ण कोव्हिड मुक्त झाले आहेत.

आयटीआयची प्रवेश प्रवेशप्रक्रिया 1 ऑगस्टपासून; यंदा तब्बल 'इतक्या' जागा उपलब्ध....

एसटी महामंडळानेही खबरदारीचा उपाय म्हणून  कर्तव्यावरील प्रत्येक चालक-वाहकाला मास्क, सॅनिटायझर तसेच, प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या अर्सनिक-30 या होमिओपथिक  औषधाच्या गोळ्या दिल्या आहेत.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So many ST employees are corona free; Ready to return to work ...