Online Fraud : व्हिडिओ ‘लाईक’ करण्याच्या निमित्ताने महिला फॅशन डिझानरची 10.60 लाख रुपयांची फसवणूक; २ आरोपी अटकेत

सोशल मीडियावरील व्हिडिओ ‘लाईक’ करण्याच्या निमित्ताने महिला फॅशन डिझानरची 10.60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात सायबर पोलिसांना आले यश.
online fraud
online fraudSakal

मुंबई - सोशल मीडियावरील व्हिडिओ ‘लाईक’ करण्याच्या निमित्ताने महिला फॅशन डिझानरची 10.60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

सुमित गुप्ता आणि पार्थ पांचाळ अशी अटक आरोपींची नावे असून आरोपी गुप्ता कांजूरमार्गचां , तर पांचाळ हा बदलापूरचा रहिवासी आहे. यापूर्वी पांचाळला फसवणुकीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनीही अटक केली होती. आरोपींच्या खात्यातील सहा लाख रुपये गोठवण्यात आल्याचे पोलिसांकडून माहिती मिळत आहे.आरोपींनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहे.

घटनाक्रम

या प्रकरणी 46 वर्षीय तक्रारदार महिला फॅशन डिझायनर विलेपार्ले परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या तक्रारीवरून पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी यावर्षी 7 एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार महिलेला दिव्या नावाच्या मुलीने मोबाईलवर मेसेज पाठवला होता.

युट्युबवर मार्केटिंगचे काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमीष मेसेजमध्ये दाखवण्यात आले होते. त्याला भुरळ पडत महिलेने होकार दिल्यानंतर तक्रारदार महिलेला एक लिंक प्राप्त झाली. त्याद्वारे तिला टेलिग्राम चॅनेलवर समाविष्ट करण्यात आले. तक्रारदार महिलेने व्हिडिओ लाईक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर सुरूवातीला काही रक्कम जमा झाली.

विश्वास संपादन करून फसवणूक

विश्वास संपादन करून तिने आणखी फायदा हवा असल्यास गुंतवणुकीचे आमीष दाखवले. आरोपीने तक्रारदार महिलेला 30 ते 40 टक्के नफा देण्याचे आश्वासन देऊन या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. तक्रारदार महिलेने पैसे गुंतवले आणि आभासी खात्यामध्ये तिला नफाही झालेला दिसत होता.

मात्र, जेव्हा तिने वॉलेटमधून तिच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला असता पैसे हस्तांतरित झाले नाही. त्यानंतर तिने आरोपी महीलेला याबाबत विचारणा केली. त्यांनी तिला सांगितले की महिलेच्या टास्कमध्ये काही त्रुटी होती. ती पूर्ण केली आणि आणखी रक्कम ई-वॉलेटमध्ये भरल्यास ही रक्कम मिळेल असे आश्वासन दिलं. त्यानंतर तक्रारदार महिलेना आणखी रक्कम भरली.

पण त्यानंतरही पैसे हस्तांतरित होत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. परंतु तोवर महिलेची 10 लाख 67 हजार रुपये हस्तांतरित झाले होते. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपींच्या खात्यावर फसवणुकीची रक्कम जमा झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com